महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 17, 2021, 1:17 PM IST

ETV Bharat / state

VIDEO : पुसदमध्ये गोर समाजाचा महाआक्रोश मोर्चा

३ डिसेंबरला काळी दौलतखान येथील श्याम राठोड या तरुणाचा खून (Shyam Rathod Murder) झाल्यानंतर गोर सेना आक्रमक झाली आहे. यानंतर गावात दंगल होऊन दोन गटात तणाव निर्माण झाला. गोर सेनेतर्फे आज शुक्रवारी पुसद येथे महाआक्रोश मोर्चा (Mahaakrosh Morcha in Pusad) आयोजित करण्यात आला आहे.

Mahaakrosh Morcha
Mahaakrosh Morcha

यवतमाळ : ३ डिसेंबरला काळी दौलतखान येथील श्याम राठोड या तरुणाचा खून (Shyam Rathod Murder) झाल्यानंतर गोर सेना आक्रमक झाली आहे. यानंतर गावात दंगल होऊन दोन गटात तणाव निर्माण झाला. गोर सेनेतर्फे आज शुक्रवारी पुसद येथे महाआक्रोश मोर्चा (Mahaakrosh Morcha) आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी कलम ३७ नुसार जमावबंदी लागू केली. श्यामचा खून झाल्यानंतर काळी गावात दंगल उसळली होती.

बंजारा समाजाचा महाआक्रोश मोर्चा

या प्रकरणी सहा आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करावी, त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी द्यावी. अशा अन्य मागण्या घेऊन गोर सेनेने महाआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला येथून पोलीस कुमक पुसद मध्ये बंदोबस्त कामी असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पुसद (Pusad) येथील वसंतउद्यान ते बसस्टँड, शिवाजी चौक, सुभाष चौक, आंबडेकर चौक, मुखरे चौक, मार्गे यशवंत रंगमंदिर (स्टेडीयम) येथे महाआक्रोश मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

हेही वाचा -Raj Thackeray In Nashik : राज ठाकरेच्या दौऱ्यात पक्षात मेगा भरती, मात्र पक्षाला उभारी देणारे किती?

ABOUT THE AUTHOR

...view details