महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 17, 2021, 4:04 PM IST

Updated : Dec 17, 2021, 4:12 PM IST

ETV Bharat / state

Gorsena Aakrosh Morcha Yavatmal : जमावबंदीचा आदेश झुगारत गोरसेनेचा धडक मोर्चा; मृतकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी

श्याम राठोड या तरुणाच्या हत्या प्रकरणी ( Kali Daulatkhan Murder Case ) आता गोरसेना ( Gorsena )आक्रमक झाली आहे. पुसदमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारत ( Violation of Curfew Order ) मोठ्या संख्येत गोरसेनेचा मोर्चा धडकला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण ( Gorsena National President Sandesh Chavan ) यांनी दिला आहे.

धडक मोर्चा
धडक मोर्चा

यवतमाळ -जिल्ह्यातील काळी दौलतखान येथील श्याम राठोड या तरुणाच्या हत्या प्रकरणी ( Kali Daulatkhan Murder Case ) आता गोरसेना ( Gorsena )आक्रमक झाली आहे.पुसदमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारत ( Violation of Curfew Order ) मोठ्या संख्येत गोरसेनेचा मोर्चा धडकला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण ( Gorsena National President Sandesh Chavan ) यांनी दिला आहे. राज्याला ज्या बंजारा समाजाने दोन मुख्यमंत्री दिले. त्यांच्याच भूमीत गोर बंजारांना न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचा खेदही यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवाय यावेळी पोलीस प्रशासनाचा निषेध ( Police Administration ) नोंदवण्यात आला.

गोरसेना अध्यक्ष संदेश चव्हाण यांची प्रतिक्रिया

३ डिसेंबरला काळी दौलतखान येथील श्याम राठोड या तरुणाचा खून झाल्यानंतर गोरसेना आक्रमक झाली. पुसद येथे महाआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. दरम्यान या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी जमावबंदी लागू केली. तगडा पोलीस बंदोबस्त असतानाही गोरसेनेने मोर्चा काढला. श्यामचा खून झाल्यानंतर काळी गावात दंगल ऊसळली होती. याप्रकरणी सहा आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करावी, त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी द्यावी, अट्रोसिटी कायद्याप्रमाणे बंजारा समाजावरील अत्याचार रोखण्यासाठी वेगळा कायदा करावा, अशा मागण्या घेऊन गोर सेनेने महाआक्रोश मोर्चा काढला. राज्यात बंजारा समाजावरील अन्याय अत्याचार रोखावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

  • काय घडली होती घटना?

काळी दौलतखान या गावात दुचाकीवरून जाताना एका तरुणाला दुचाकीचा कट लागला. यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर होऊन श्याम शेषराव राठोड (वय 22 वर्षे) या तरुणावर तलवारीने हल्ला करून त्याचा खून ( Yavatmal Kali Daulat youth murder case ) करण्यात आला. त्यामुळे या गावात दोन गटात तणाव निर्माण झाला. तणाव चांगलाच वाढला असून गावातील रात्रीच्या सुमारास दुकानाची जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्याचा मारा पोलिसांकडून करण्यात आला होता.

हेही वाचा -Kali Daulatkhan Murder Case : गोरसेनेच्या आक्रोश मोर्चावर बंदी- सहभागी झाल्यास होणार कारवाई - पोलीस अधीक्षक

Last Updated : Dec 17, 2021, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details