महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्युत स्पार्किंगमुळे आष्टा गावात आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे नुकसान नाही

या आगीचा गावाबाहेर धूर दिसू लागल्याने गावातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. गावातील प्रत्येकाने आपापल्या घरी असलेल्या बोरिंग हँडपम्पवरून पाणी घेऊन आग विझविण्यासाठी धाव घेतली.

By

Published : May 4, 2019, 12:58 PM IST

विद्युत स्पार्किंगमुळे आष्टा गावात आग

यवतमाळ- राळेगाव येथुन ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टा येथे विद्युत तारांच्या स्पर्शाने स्पार्किंग होऊन दुपारच्या सुमारास आग लागली. गावातील नागरिकांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आष्टा गावालगत १०० फुटांवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीची रोहित्र असून या रोहित्रावर स्पार्किंग होऊन विस्तवाचे लोंढे सुकलेल्या गवतावर पडल्याने आग लागली.

या आगीचा गावाबाहेर धूर दिसू लागल्याने गावातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. गावातील प्रत्येकाने आपापल्या घरी असलेल्या बोरिंग हँडपम्पवरून पाणी घेऊन आग विझविण्यासाठी धाव घेतली. तसेच जानराव गिरी यांना आष्टा येथे आग लागल्याचे कळताच त्यांनी आपला स्वतःचा पाण्याचा टँकर पाठवून आग विझविण्यास मदत केली.

विद्युत स्पार्किंगमुळे आष्टा गावात आग

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच या आगीची माहिती कळताच महसूल विभागाचे तलाठी गिरीश खडसे, ग्रामसेवक उम्रतकर हे घटनास्थळी पोहोचले आणि आगीची विचारपूस केली. यावेळी गावातील सुनील पारिसे, संजय भोरे, विशाल तोडसे, मनोहर बोरवार तसेच इतर नागरिकांनी आग विझविण्यास मदत केली.

ABOUT THE AUTHOR

...view details