महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2020, 7:04 PM IST

ETV Bharat / state

बोगस बीटी बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, सबंधित दोषी बीटी बियाणे कंपन्यांवर कारावाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Farmers demand action against bogus Bt seed yavatmal
शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव

यवतमाळ -गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, सबंधित दोषी बीटी बियाणे कंपन्यांवर कारावाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी तहसील कार्यालय गाठत, तहसीलदारांना घेराव घातला.

शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव

महागाव तालुक्यात परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. त्यातच बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटदेखील ओढावले होते आणि आता कापसावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकरी संकटात सापडा आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्याथा मांडत बोगस बियाणे कंपन्यांवर कारावाई करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details