महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2019, 6:41 PM IST

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कापसाच्या भावासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

काही शेतकऱ्यांच्या मुलांनी 4 नोव्हेंबरला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने रस्ता रोको आंदोलन केले होते. तर आज शेतकऱ्यांनीच रस्त्यावर उतरून बाजार समितीच्या आवारात आंदोलन केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कापसाच्या भावासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

यवतमाळ- जिल्ह्यातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. मात्र, कापसाची आवक वाढताच रायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडण्यास सुरुवात केली. राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असल्याने व्यापारी वर्गाने कापसाचे भाव कमी केले. त्यामुळे आज शेतकरी वर्गाने बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

कापसाच्या भावासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

हेही वाचा -उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राचा खून

काही शेतकऱ्यांच्या मुलांनी 4 नोव्हेंबरला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने रस्ता रोको आंदोलन केले होते. तर आज शेतकऱ्यांनीच रस्त्यावर उतरून बाजार समितीच्या आवारात आंदोलन केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या कापसाला 4 हजार 200 ते 4 हजार 800 भाव व्यापाऱ्याकडून सोडण्यात येत होता. वास्तवात हमीभाव 5 हजार 500 च्यावर असल्याने हा दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details