महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 16, 2020, 5:18 PM IST

ETV Bharat / state

दुर्गा मातेच्या साज खरेदीसाठी भाविकांची बाजारात गर्दी; साध्या पद्धतीने होणार घटस्थापना

यंदा कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने दुर्गा उत्सव साजरा केला जाणार आहे. उद्या घटस्थापना होणार असून, देवीला लागणारा साज खरेदीसाठी भाविकांनी आज बाजारात गर्दी केली होती.

yavatmal navratri festival
दुर्गा मातेच्या साज खरेदीसाठी भाविकांची बाजारात गर्दी

यवतमाळ -येथील दुर्गा उत्सव देशात दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून ओळखला जातो. विविध मंडळाच्यावतीने आकर्षक देखावे निर्माण केले जातात. यंदा कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने दुर्गा उत्सव साजरा केला जाणार आहे. उद्या घटस्थापना होणार असून, देवीला लागणारा साज खरेदीसाठी भाविकांनी आज बाजारात गर्दी केली होती.

दुर्गा मातेच्या साज खरेदीसाठी भाविकांची बाजारात गर्दी

हेही वाचा -ईटीव्ही भारत स्पेशल : गडचिरोलीत ऑनलाइन शिक्षण 'नॉट रिचेबल'; भिंती देतात विद्यार्थ्यांना धडे

शहरातील विविध भागात दुर्गा देवी मंडळाच्यावतीने दरवर्षी दुर्गा देवी बसवली जाते. यंदा कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने देवीचे आगमन होणार आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन केले जाणार आहे. कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. नवरात्रात यवतमाळ शहरात जिल्हाभरातून भाविक देखावे बघण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यावर्षी कुठेही आकर्षक देखावे राहणार नाही. गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कालपासून रात्री नऊपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी मोकळ्या मनाने खरेदी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details