महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 3, 2019, 6:11 PM IST

ETV Bharat / state

उमरखेड मतदारसंघात आमदार नजरधने यांना भाजपचा ठेंगा, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष महादेव ससाने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले. तसेच तातडीने उमेदवारी बदलून आमदार राजेंद्र नजरधने यांनी उमेदवारी बहाल करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलन करताना भाजप कार्यकर्ते

यवतमाळ - उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे भाजपने तिकीट कापले आहे. त्यामुळे उमरखेड आणि महागाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच बुथ प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. आमदार राजेंद्र नजरधने यांच्या समर्थनात महागाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

उमरखेड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष महादेव ससाने यांनी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले. तसेच तातडीने उमेदवारी बदलून आमदार राजेंद्र नजरधने यांनी उमेदवारी बहाल करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा याच मतदारसंघातील आहेत. आमदार नजरधने आणि नितीन भुतडा यांचे संबंध फारसे चांगले नाही. त्यामुळे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून आमदार राजेंद्र नजरधने हे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बंडखोरी करतात, की पक्षाने दिलेल्या उमेदवारासोबत राहतात? हे शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details