महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 11, 2020, 10:37 AM IST

ETV Bharat / state

कोरोना संशयिताचा मृत्यू; वैद्यकीय अहवाल येणे बाकी

यवतमाळमधील महागाव तालुक्यात निमोनियाची लक्षणे असलेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

Corona suspect
कोरोना संशयित

यवतमाळ - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यवतमाळमधील महागाव तालुक्यात निमोनियाची लक्षणे असलेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

मृत व्यक्तीला मागील काही दिवसांपासून ताप, खोकला, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे 10 एप्रिलच्या रात्री ते जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वत: दाखल झाले होते. त्यांचे वैद्यकीय नमुने घेऊन तपासणीसाठी लगेच नागपुरला पाठवण्यात आले होते. अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

उपचारादरम्यान मध्यरात्री 1.45 वाजता या ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मागील तीन महिन्यांपासून ते कुठेही गेले नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. सिव्हियर अॅक्यूट रेस्पायरेटरी इलनेस (श्वसनाचा त्रास) आणि निमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यांचा वैद्यकीय अहवाल मिळालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details