महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 9, 2020, 9:36 PM IST

ETV Bharat / state

वाशिममध्ये गीत गायनातून कोरोनाबाबत जनजागृती

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वाशिमच्या पोलीस प्रशासनाने मराठी पत्रकार परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यावेळी आदिती लोखंडे या बालगायिकेने प्रबोधनपर गीत सादर केले.

awareness-about-covid-19-with-singing-in-washim
वाशिममध्ये गीत गायनातून कोरोनाबाबत जनजागृती

वाशिम - कोरोना विषाणूचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या महामारीचा मुकाबला घरी राहूनच होऊ शकतो हे एव्हाना सर्वांना पटले आहे. तरीही काही लोक घराबाहेर पडून या संकटाला ओढवून घेतात. यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्नही अनेकजण करीत आहेत. असाच एक प्रयत्न केलाय वाशिममधील पोलीस व मराठी पत्रकार परिषदने.

वाशिममध्ये गीत गायनातून कोरोनाबाबत जनजागृती

पोलीस व मराठी पत्रकार परिषद यांच्यावतीने वाशिमध्ये जनजागृतीची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी आदिती लोखंडे या चिमुकलीने आपले गायन सादर करून प्रबोधनाचा प्रयत्न केला. यावेळी तिने 'इस जमाने मे न जाने क्यूं लोग घरोसे निकला करते है !' हे गीत सादर केले. कोरोना जनजागृतीबद्दल वाशिमचे पोलीस व मराठी पत्रकार करीत असलेल्या प्रयत्नाचे शहरवासीय कौतुक करीत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details