महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2019, 4:28 PM IST

ETV Bharat / state

बोर अभयारण्यात 'त्या' ऐटीतील चालीने पर्यटक सुखावले

सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पट्टेदावर वाघाच्या दर्शनाने पर्यटक चांगलेच सुखावले आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. पहिल्यांदाच बोर येथील वाघाची चाल कॅमेरात टिपल्या गेल्याचे सांगितले जात आहे. तो वाघ बोरच्या टी-वन वाघिणीचा बछडा असल्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे.

बोर अभयारण्यात निदर्शनास आलेल्या वाघाचे छायाचित्र

वर्धा - विदर्भाला मोठ्या प्रमाणात जंगल संपदा लाभली आहे. यात व्याघ्र प्रकल्पाने चांगलीच शोभा वाढवली, असे असले तरी, वाघाचे दर्शन तसे दुर्लभच आहे. जंगलात दिवसभराच्या सफारीनंतर वाघाचे दर्शन होते. दरम्यान, सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पट्टेदार वाघाच्या दर्शनाने पर्यटक चांगलेच सुखावले आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले. पहिल्यांदाच बोर येथील वाघाची चाल कॅमेरात टिपल्या गेल्याचे सांगितले जात आहे. तो वाघ बोरच्या टी-वन वाघिणीचा बछडा असल्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे.

बोर अभयारण्यात निदर्शनास आलेल्या वाघाचे छायाचित्र

बोर व्याघ्र प्रकल्पात बाजीराव नामक वाघाची देखील अशीच डौलदार चाल होती. मात्र त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा वाघाची ही चाल पाहून पर्यटक सुखावले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी सफारी उपलब्ध आहे. मागील काही दिवसांपासून पर्यटकांची सफारी सुरू आहे. योगेश भांडारकर हे जंगल सफारी करत असताना जिप्सीचालक मनोज लाखे यांना व्याघ्र दर्शन झाले. यावेळी गाईड शुभम पाटील माहिती देत होते. दरम्यान, अचानक वाघ पुढे आला. हा वाघ पाच ते सहा वर्षांचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पर्यटकांना वाघाचे दर्शन झाल्याने जंगल सफारी अधिकच आनंददायी झाली असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली.

हेही वाचा-शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन, कर्ज वसुलीस मुदतवाढ मिळाल्याने शांत

ABOUT THE AUTHOR

...view details