महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narmada Water Issue : गुजरात निवडणुकीत शेतकऱ्यांना पाणी न देता, पाणी अदानी, अंबानींना...; मेधा पाटकरांची टीका - शेतकऱ्यांना आश्वासन दिले

Narmada Issue In Gujarat Election: नर्मदेचे पाणी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, पण त्यांनी तेच नर्मदेचे पाणी अदानी, अंबानींच्या कंपन्यांना दिल्याचा घणाघात मेधा पाटकर यांनी करत नर्मदाच्या बाबतीत जे गुजरात राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. ते पूर्ण न करता त्यांचे पाणी कंपन्यांना दिले. विशेष म्हणजे नर्मदा बचाव आदोलन आम्ही करत होतो.

Narmada Issue In Gujarat Election
Narmada Issue In Gujarat Election

By

Published : Nov 29, 2022, 4:53 PM IST

ठाणे:गुजरात निवडणुकीच्या प्रचारात नर्मदेचा मुद्दा उपस्थित झाल्याने त्यांच्या मनात धडकी भरली. वास्तविक नर्मदेचे पाणी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, पण त्यांनी तेच नर्मदेचे पाणी अदानी, अंबानींच्या कंपन्यांना दिल्याचा घणाघात मेधा पाटकर यांनी करत नर्मदाच्या बाबतीत जे गुजरात राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. ते पूर्ण न करता त्यांचे पाणी कंपन्यांना दिले. विशेष म्हणजे नर्मदा बचाव आदोलन आम्ही करत होतो. त्यावेळी आमच्यावर हल्ले झाले आहेत.

मेधा पाटकरांची टीका

नफरत छोडो संविधान बचाओ: आज त्याच हल्लेखोरांना गुजरात निवडणुकीची उमेदवारी दिली. मात्र आम्ही मागे हटणार नाही. सत्याच्या मार्गानेच आमचा हक्क आम्ही मिळवणार असल्याची गर्जना नर्मदा बचाओ, आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांनी भिवंडीतील 'नफरत छोडो संविधान बचाओ' जनसंवाद यात्रेतील भाषणात केली आहे. यामुळे पुन्हा गुजरात निवडणुकीत नर्मदेचा मुद्दा गाजणार असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय पुरुषाचा इतिहास बदलू देणार नाही:मेधा पाटकर पुढे म्हणाल्या की, सध्याची शिक्षण समिती ही जातीय वाद्यांच्या संस्थेच्या हातात असल्याने त्यांनी नर्मदेचा धडा पाठक्रमातून काढला. त्याचे आम्हला काही दुःख नाही. मात्र त्यांनी देशाचे नागरी शास्त्राचा धडा पाठक्रमातून काढल्याने आम्हाला दुःख नाही, तर राग येईल असे काम त्या समितीने केले. परंतु आमच्या विविध राष्ट्रीय पुरुषाचा इतिहास बदलू देणार नाही. त्यामुळे आम्ही ना कधी घाबरलो. या पुढेही नाही घाबरानं असे इशारा मेधा पाटकर यांनी आपल्या भाषणातून सध्याच्या शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करणाऱ्यांना दिला.

नोटबंदीची तयारी आदीपासून: देशातल्या शेतकऱ्यांना आजही कर्ज माफी दिली नाही. उलट त्यांनी उद्योगपतींचे दरवर्षी साडे पाच लाख कोटी कर्ज माफ केले. यामुळे अनेक बँका बुडीत निघाले. मात्र त्याचे कोणाला काही चिंता नाही. आता नवीन खेळ समोर आला. नोटबंदीचा काळातील नोटबंदीची तयारी आदीपासून केंद्र सरकराने करून नवीन नोटाही छापून ठेवले होते. एवढाच काय उर्जित पटेल ज्यावेळी रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर नसतानाच त्यांची सही घेऊन ठेवली होती. आता समजले की, नोटबंदी आणि जीएसटी हे केंद्र सरकरच षड्यंत्र असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर मेधा पाटकर यांनी त्यांच्या भाषणातून केली आहे.

नर्मदा बचाव आंदोलन: दरम्यान नफरत छोडो संविधान बचाओ जनसंवाद यात्राची सभा भिवंडीत आयोजित करण्यात आली होती. ही सभा संपल्यावर यात्रेचा आरंभ भिवंडी शहरातून करण्यात आला. देशभर विविध ५०० जिल्ह्यात ही यात्रा जाणार असून ठाणे जिल्ह्यात या यात्रेचा शुभारंभ नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details