महाराष्ट्र

maharashtra

एपीएमसी मार्केटमध्ये अडीच लाखांची चोरी... घटना सीसीटीव्हीत कैद

By

Published : Jul 22, 2020, 5:27 PM IST

कोरोनामुळे एपीएमसी मार्केटमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे. याचा फायदा घेत दोन चोरट्यांनी एका दुकानाचे कुलूप तोडून अडीच लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे. ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

theft-of-rs-2-dot-5-lakh-in-apmc-market-at-nvi-mumbai
एपीएमसी मार्केटमध्ये अडीच लाखांची चोरी..

नवी मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यात एपीएमसी मार्केटमध्ये एका भाजीपाला व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरुन चोरट्यांनी अडीच लाख रुपये लांबवले आहेत. ही घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये अडीच लाखांची चोरी..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. सद्यस्थितीत बँकेच्या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे एपीएमसी मधील फळ व भाजीपाला मार्केट मधील व्यापारी वर्गाला शेतकऱ्यांना रोख रक्क द्यावी लागते.

कोरोनामुळे एपीएमसी मार्केटमध्ये सध्या सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे. याचा फायदा घेत दोन चोरट्यांनी एका दुकानाचे कुलूप तोडून अडीच लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे. ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. एकीकडे कोरोनामुळे होत असलेले नुकसान तर दुसरीकडे चोरीचे संकट यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details