महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2021, 6:49 PM IST

ETV Bharat / state

कौटुंबिक हिंसाचाराचा कळस; ६० वर्षाच्या वैवाहिक जीवनाचा भयानाक अंत

एका ८४ वयाच्या पतीने ८० वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवलीनजीक गोळ्वली गावात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

terrible end of sisty years of married life in thane
कौटूंबिक हिंसाचाराचा कळस; ६० वर्षाच्या वैवाहिक जीवनाचा भयनाक अंत

ठाणे -६० वर्षाहून अधिक काळ एकत्र राहून वैवाहिक जीवनाचा भयानक अंत झाल्याने कौटुंबिक हिंसाचाराने कळस गाठला आहे. एका ८४ वयाच्या पतीने ८० वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवलीनजीक गोळ्वली गावात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आधी पत्नीला पतीने धारदार शस्त्राने वार केले. त्यांनतर घरातच तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. बळीराम पाटील (८४) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर पार्वती (८०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीचा मुलगा कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचा माजी नगरसेवक आहे.

आदी शस्त्राने वार, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न -

डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात आरोपी बळीराम पाटील हे मृत पत्नी पार्वती सोबत राहत होते. काही कारणावरून काल रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपी बळीराम यांनी पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आरोपी पती एवढेच नाही थांबला, तर आरोपी बळीराम पाटील याने पत्नीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळी घरातील एक सदस्य आरोपीच्या बेडरूम गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

घरगुती वादामुळे हत्या झाल्याचा अंदाज -

घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करीत आरोपी बळीराम पाटील यांना ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी, घरगुती भांडणातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे एका भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आईची निर्घृण हत्या वडिलांनी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

हेही वाचा - ममता दीदींना मोठा धक्का ; टीएमसीच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details