ठाणे : भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधारगृह असून, हे बालसुधारगृह भिवंडीतील एका संस्थेमार्फत चालविण्यात येते, विशेष म्हणजे या बालसुधारगृहात असलेल्या मुलांच्या देखभालीसह शिक्षणासाठी अनुदानित संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या वतीने येथील अल्पवयीन मुलांच्या शिक्षणासाठी काही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र, या बालसुधारगृहात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका चाळीस वर्षीय शिक्षिकाही येथील काही मुलांचे लैगिक शोषण करीत असल्याच्या वारंवार तक्रारी पीडित मुलांकडून केल्या जात होत्या.
सदर शिक्षिकेला तीन महिन्यांपूर्वी केले होते निलंबित :त्यातच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेशी काही कर्मचारी आणि संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर सदर शिक्षिकेला तीन महिन्यांपूर्वी निलंबित केले. शिवाय बाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित प्रकरणाची जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून चौकशी सुरू असतानाच, बालसुधारगृहातील मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पीडित मुलांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्या शिक्षिकेवर शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.