महाराष्ट्र

maharashtra

कल्याणमध्ये पुन्हा आढळला 2 तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप

By

Published : Aug 6, 2020, 8:51 PM IST

Updated : Aug 6, 2020, 10:14 PM IST

कल्याणच्या गंधारे परिसरात राहणाऱ्या डिंपल शहा यांच्या ऋतू रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी तत्काळ वाॅर रेस्क्यू फाॅऊंडेशनच्या टिमला संपर्क केला. त्यानंतर सर्पमित्र निलेश नवसरे व सर्पमित्र प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला आहे.

Rare ghonas snake with 2 mouths found  in Kalyan
कल्याणमध्ये पुन्हा आढळला 2 तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप

ठाणे -कल्याणच्या गंधारे परिसरात राहणाऱ्या डिंपल शहा यांच्या ऋतू रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी तत्काळ वाॅर रेस्क्यू फाॅऊंडेशनच्या टिमला संपर्क केला. त्यानंतर सर्पमित्र निलेश नवसरे व सर्पमित्र प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला आहे. हा साप दोन तोंड असलेली दुर्मिळ घोणस असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकीकडे कोरोनासारखी महामारी व त्यातच अतिवृष्टीमुळे मनुष्यवस्तीमध्ये विषारी बिन विषारी सापांचा शिरकाव वाढला आहे. अशा परिस्थितीतही सोशल डिस्टनचे नियम पाळून वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन ही संस्था व सर्पमित्र हे वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन आणि जनजागृतीसाठी कार्य करत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही 20 सप्टेंबर 2019 रोजी गंधारे परिसरात दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणसचा वाॅर रेस्क्यू फाॅऊंडेशनच्या टिमने बचाव केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यावेळी सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधन कार्यासाठी ताब्यात दिले होते. परंतू, संशोधन सुरू असताना सदर सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुसऱ्यांदा या दोन तोंडाच्या घोणस सापाला जिवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याची माहिती वाॅर रेस्क्यू टिमचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली.

कल्याणमध्ये पुन्हा आढळला 2 तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप


गतवर्षी हाफकिन संस्थेचे संशोधन कार्य अपूर्ण राहिले होते. आता या दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस सापाचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येणार आहे. वनविभागाचे उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी वाघेरे यांचे आदेश येईपर्यंत यांचा संभाळ करण्यात येणार आहे. तसेच वरील दोन्ही दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. या घटनेची जागतिक स्तरावर नोंद करून सरिसृप संशोधन पपत्र ( Reptiles Rescerch Paper) जाहीर करणार असल्याचे वन्यजीव अभ्यासक व वाॅर रेस्क्यू टिमचे सचिव सुहास पवार यांनी सांगितले. यावेळी विशाल कंथारिया, स्वप्निल कांबळे, निखिल कांबळे, हितेश करंजगावकर, उपस्थित होते.

Last Updated : Aug 6, 2020, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details