महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2020, 8:43 AM IST

ETV Bharat / state

COVID19: ठाण्यात 'होम क्वारंटाईन' व्यक्तींवर पोलिसांचा वॉच...

गेल्या काही दिवसापांसून कल्याण झोनच्या पोलीस कंट्रोल रुमला 'होम क्वारंटाईन' असलेले व्यक्ती सोसायटी बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी काही रहिवाशांनी केल्या होत्या. त्यानुसार 'होम क्वारंटाईन' व्यक्तीवर पोलीस नजर ठेवत आहेत.

police-watch-on-home-quarantine-persons-in-thane
ठाण्यात 'होम क्वारंटाईन' व्यक्तींवर पोलीसांचा वॉच...

ठाणे- कल्याण, डोंबिवली शहरातील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी कल्याण पोलीस कंट्रोल रुमशी संपर्क करुन 'होम क्वारंटाईन' असलेले व्यक्ती सोसायटी बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'होम क्वारंटाईन' व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्या व्यक्तींशी पोलीस चर्चा करीत आहेत.

ठाण्यात 'होम क्वारंटाईन' व्यक्तींवर पोलीसांचा वॉच...

हेही वाचा-CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसापांसून कल्याण झोनच्या पोलीस कंट्रोल रुमला 'होम क्वारंटाईन' असलेले व्यक्ती सोसायटी बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी काही रहिवाशांनी केल्या होत्या. त्यानुसार 'होम क्वारंटाईन' व्यक्तीवर पोलीस नजर ठेवत आहेत. तसेच त्यांना धीर देऊन त्यांना काही औषधाची किंवा इतर वस्तूंची गरज भासल्यास त्याचीही व्यवस्था करीत आहे. पोलीस त्यांना व्हिडिओ कॉल करुन याबाबत विचारपूस करीत आहेत.

विशेष म्हणजे 'होम क्वारंटाईन' व्यक्ती हा घरात स्वच्छता राखतो का?, वेळेवर औषध, जेवण घेतो का? असे संबधित प्रश्न पोलीस त्यांना विचारत आहेत. तर दुसरीकडे तो व्यक्ती घर सोडून गेला नाही ना? त्याबद्दल लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.
दरम्यान, डोंबिवली रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'होम क्वारंटाईन' व्यक्तीची चौकशी केली. त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. तसेच काही मदत लागली तरी पोलीस मदतीसाठी तयार आहेत, असेही सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details