महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना योद्धाः सुट्टीवर आलेल्या नर्सला कोरोनाची साखळी तुटण्याचा विश्वास

मुंबईत कोरोनाबाधितांची सेवा केल्यानंतर नर्स दर्शना सराफ या काही दिवसांसाठी बदलापूर येथे घरी परतल्या आहेत. यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी त्यांचे स्वागत केले.

By

Published : May 9, 2020, 10:46 AM IST

Updated : May 9, 2020, 12:30 PM IST

thane corona update
कोरोना योद्धाः सुट्टीवर आलेल्या नर्सला कोरोनाची साखळी तुटण्याचा विश्वास

ठाणे- १५ दिवसांच्या कोरोना रुग्ण सेवेनंतर मुंबईहुन बदलापूर येथील घरी आलेल्या एका नर्सने कोरोनाची साखळी तुटण्याचा विश्वास व्यक्त केला. तर शिक्षण घेताना आपत्कालीन सेवेत काम कसे करायचे हे शिकले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम करताना एक वेगळा अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय कोरोना रुग्णांची सेवा करून आलेल्या या नर्सचे सोसायटीतील रहिवाशांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे.

कोरोना योद्धाः सुट्टीवर आलेल्या नर्सला कोरोनाची साखळी तुटण्याचा विश्वास

दर्शना प्रतीक सराफ असे या कोरोनाशी लढणाऱ्या योद्धाचे नाव असून त्या शिरगाव आपटेवाडीतील जगन्नाथ आरकेड नावाच्या सोसायटीत राहतात. दर्शना गेल्या ७ वर्षांपासून मुंबईतील एका रुग्णालयात नर्स म्हणून कर्यरत आहेत. त्यांनी सलग १५ दिवस कोरोना रुग्नांच्या सेवेनंतर त्यांना काही दिवसाची रजा मिळाली आहे. त्यामुळे त्या बदलापूरमध्ये आज आपल्या घरी आल्या त्यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी कोरोनाशी लढणाऱ्या योद्धा दर्शना सराफ यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. दर्शना या गेले अनेक दिवस स्वतःचा कोरोना विषाणूंपासून बचाव करीत असंख्य कोरोना ग्रस्त रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यामुळे दर्शना यांचे कार्य हे देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांएवढेच आहे, अशी भावना त्या राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्त करीत केली. सोसायटीतील रहिवाशांकडून झालेले स्वागत पाहून त्या भारावून गेल्या होत्या.

Last Updated : May 9, 2020, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details