महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 2, 2020, 5:32 PM IST

Updated : Oct 2, 2020, 5:45 PM IST

ETV Bharat / state

"किसान बचाओ, मजदूर बचाओ" घोषणेसह काँग्रेसचा सत्याग्रह!

केंद्रातील भाजपा सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. "किसान बचाओ, मजदूर बचाओ" या घोषणेसह मिरा-भाईंदर काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

Congress agitation against farmers and labor law
शेतकरी आणि कामगार कायद्याचा विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह

ठाणे - केंद्रातील भाजपा सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. "किसान बचाओ, मजदूर बचाओ" या घोषणेसह मीरा-भाईंदर काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकरी आणि कामगार कायद्याचा विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्याग्रहास उतरलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमुळे भाईंदर पूर्वेमध्ये काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. "किसान बचाओ, मजदूर बचाओ, भाजपा हटाव, देश बचाओ" अशा घोषणा देत कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. बी पी रोड कॉंग्रेस कार्यालय ते स्वातंत्र्यसैनिक स्मारक, नवघर परिसरात निषेधाचे फलक घेऊन कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपाविरोधात घोषणाबाजी करत होते.

तसेच, उत्तर प्रदेशात हाथरस येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद सुद्धा या आंदोलनात दिसले. मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर धरणे सत्याग्रहाला विराम देण्यात आला. यावेळी जिल्हाअध्यक्ष प्रमोद सामंत, युवाजिल्हाध्यक्ष दीप काकडे, अंकुश मालुसरे व नगरसेवक उपस्थित होते.

Last Updated : Oct 2, 2020, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details