महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2022, 6:53 PM IST

ETV Bharat / state

Lure Of Increased Interest : हायप्रोफाईल सोसायटीत कार्यालय थाटून वाढीव व्याजाचे आमिष, गुंतवणूकदारांना ५ कोटींचा गंडा

हायप्रोफाईल सोसायटीत कार्यालय थाटून भामट्यांच्या टोळीने भरभक्कम व्याजाचे आमीष (Lure Of Increased Interest) दाखवून सुमारे ३०० गुंतवणुकीदारांना ५ कोटीच्यावर गंडा (investors 5 crore fraud in Thane) घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली जवळील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या लोढा पलावा सिटीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गंडा घालणाऱ्या भामट्यांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल (Case file against fraudsters) करण्यात आला.

Lure Of Increased Interest
Lure Of Increased Interest

ठाणे : हायप्रोफाईल सोसायटीत कार्यालय थाटून भामट्यांच्या टोळीने भरभक्कम व्याजाचे आमीष (Lure Of Increased Interest) दाखवून सुमारे ३०० गुंतवणुकीदारांना ५ कोटीच्यावर गंडा (investors 5 crore fraud in Thane) घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली जवळील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या लोढा पलावा सिटीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गंडा घालणाऱ्या भामट्यांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल (Case file against fraudsters) करण्यात आला. शिबू तुलसीदार नायर, पत्नी श्रीविद्या, मध्यस्थ नीतेश मर्ढेकर, प्रवीण म्हस्के, विवेक गाढवे (सर्व. रा. लोढा पलावा) आणि त्यांचे इतर साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहे. (Latest news from Thane) (Thane Crime)

गुंतवणुकीवर ३० टक्के खात्रीलायक परताव्याचे आमीष-मुख आरोपी नायर दांपत्यांनी पलावा सिटीमध्ये इलेषन फिस्कल पिक्सी नावाचे कार्यालय सुरू केले. या कार्यलायत भामट्यांनी ग्राहकांना गुंतवणुकीवर दर आठवड्याला ५ ते १५ टक्के वाढीव व्याजाचे आमिष दाखवत होते. या अमिषाला बळी पडून कल्याण, उल्हासनगर, मुंबई, विरार, अंबरनाथ परिसरातील सुमारे ३०० हून अधिक गुंतवणूकदारांनी सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कमेची जून २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत गुंतवणूक केली. यामध्ये तक्रारदार पंकज नगराळे (रा. अंबरनाथ ) यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपी प्रवीण म्हस्के या मध्यस्थाने आरोपी नीतेश मर्ढेकर या मध्यस्थाची ओळख करुन दिली. त्यांनी इलेषन फिस्कल कंपनीत गुंतवणूक केली तर तुम्हाला दर आठवड्याला ५ ते १५ टक्के परतावा मिळेल. आमची कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तू विनियम बाजारात काम करते. आम्ही ग्राहकांना ३० टक्के खात्रीलायक परतावा देतो. अशी थाप मारून भामट्यांनी प्रवीण पंकजसह इतरही गुतवणूकदारांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले. त्यानंतर हायप्रोफाईल कार्यलयात त्यांची भेट इलेषन कंपनीचे संचालक मुख्य आरोपी शिबू नायर यांच्याशी घडून आणली.

पैशाचा तगादा लावल्याने आत्महत्येची चिट्ठी पाठविली-भामट्याच्या अमिषाला बळी पडून पंकज यांनी एक लाख ४८ हजार २०० रुपये इलेषन कंपनीत गुंतवनुक केली. ठरल्याप्रमाणे ४४ हजार ४६० परतावा आणि मूळ मुद्दल एक लाख ४८ हजार रुपये परत मिळाले. नंतर त्यांनी स्वत: आणि पत्नीच्या नावे पाच लाख ४७ हजार रुपये गुंतविले. ठरलेला कालावधी उलटला तरी परतावा मिळत नाही म्हणून पंकज यांनी मध्यस्थ आरोपी प्रवीण म्हस्के यांना संपर्क सुरू केला. पंकज पैशासाठी तगादा लावत असल्याने आरोपी प्रवीणने पंकज यांच्या व्हाॅट्सपवर आत्महत्येची चिठ्ठी पाठविली. पंकजसह इतर ५० ग्राहकांनी संचालक शिबू यांच्याकडे तगादा लावला. त्यांनी तुमचे पैसे परत करतो असे आश्वासन दिले. मात्र ३ ऑक्टोबर रोजी सर्व ग्राहक पुन्हा पलावा येथील कंपनी कार्यालयात गेले. कार्यालय बंद होते.

आत्महत्येचे चिट्ठी पाठविली, मोबाइल मात्र बंद -मुख आरोपी शिबू यांनी ग्राहकांना आत्महत्या करण्याची चिठ्ठी पाठवून ‘मी तुम्हाला पैसे परत करू शकत नाही. हे सुशील गायकवाड याने घडवून आणले होते. त्याने सगळ्यांची फसवणूक केली आहे, असे म्हटले होते. चिठ्ठी पाठविल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला. संचालक, मध्यस्थांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर विक्रोळी, कल्याण, उल्हासनगर, खार, शहापूर, विरार, ठाणे भागातील १५ ग्राहकांनी पंकज यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. सुमारे ३०० हून अधिक गुंतवणूकदारांनी तीन लाखापासून ते ३१ लाखापर्यंत भामट्याच्या इलेषन कंपनीत सुमारे ५ कोटी पेक्षा अधिक रकमेच्या गुंतवणुका केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details