महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balya singer : युट्यूबवर कोट्यवधींचा चाहता ठरलेल्या मृत बाळ्या सिंगरच्या कुटूंबाला मदतीची गरज; पंचक्रोशीतील जनसमुदयाकडुन अखेरचा निरोप

बाळ्या सिंगर उर्फ बाळा रतन दिवे हा ३० वर्षीय आदिवासी गायक अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. मात्र दोन दिवसापूर्वीच मासेमारी करताना त्याचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पत्नीसह चार मुलांचे पुढे काय होणार? हा प्रश्न त्याच्या अंत्यविधीवेळी त्याच्या चाहत्यांनी उपस्थित करून बाळा सिंगारला (final farewell to Utube fame Balya singer from Panchkroshi crowd) अखेरचा निरोप दिला. Balya singer

By

Published : Oct 29, 2022, 7:18 PM IST

Updated : Oct 29, 2022, 8:57 PM IST

Balya singer
बाळ्या सिंगर उर्फ बाळा रतन दिवे

ठाणे :अगं पोरी तू सपनात येना… जुन्या जाग्यावर भेट ना… हे गाण युट्यूबवर एक कोटीहून अधिकजणांनी पाहून लोक त्याच्या आवाजाचे चाहते झाले. विशेष म्हणजे बाळ्या सिंगर उर्फ बाळा रतन दिवे हा ३० वर्षीय आदिवासी गायक अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. मात्र दोन दिवसापूर्वीच मासेमारी करताना त्याचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पत्नीसह चार मुलांचे पुढे काय होणार? हा प्रश्न त्याच्या अंत्यविधीवेळी त्याच्या चाहत्यांनी उपस्थित करून बाळा सिंगारला (final farewell to Utube fame Balya singer from Panchkroshi crowd) अखेरचा निरोप दिला. Balya singer

संवाद साधतांना बबन हरणे


त्याच्या अंत्यविधीवेळी त्याच्या चाहत्यासह पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मात्र तालुक्यातील एकही मोठ्या राजकीय नेत्यांसह कुठलाही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे किमान आता तरी मृत बाळ्या सिंगरच्या कुटूंबाला मदत करून; त्याला श्रद्धांजली दयावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी अंत्यविधीवेळी व्यक्त केली आहे.


आदिवासी समाजातील बाळ्या सिंगर उर्फ बाळा याने आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मृत बाळा सिंगार हा पत्नी आणि चार मुलांसह शहापूर तालुक्यातील आसनगाव नजीक असलेल्या वालसेत गावातील आदिवासी पाड्यातील कुडाच्या झोपडीत राहात होता. कुटूंबाची उपजीविका चालविण्यासाठी तो मासेमारी, तर कधी वीटभट्टीवर मोलमजुरी करीत होता.


त्याची आईही मोलमजुरी करून गाणे गात होती. आईचे गाणे ऐकूनच बाळाही लहानपणी गाणे गात होता. आईला गाणे गाताना पाहून, १२ वर्षाचाच असतांना त्याला गाणे गाण्याची आवड निर्माण झाली होती. त्यासाठी त्याच्या आईने त्याला विविध आगरी, कोळी, आदिवासी गाण्याच्या कॅसेटसह टेपरेकॉर्डर घेऊन दिला होता. त्यानंतर तो अनेक मराठी, हिंदी, भोजपुरी गाणे गाऊन गावकऱ्यांचे मनोरंजन करत होता. तेव्हापासून शहापूर तालुक्यातील बाळ्या सिंगर अशी त्याची ओळख त्याची निर्माण झाली होती.


मृत बाळाच्या घरात अठरा विश्व् दरिद्र असल्याने, त्याचे आईवडील पोटाची खडगी भरण्यासाठी त्याला मासेमारीसाठी घेऊन जात होते. त्यामुळे तो जेमतेम केवळ पहिलीपर्यत शिक्षण घेऊ शकला. कालातंराने तरुण वयात आल्यानंतर आईवडिलांनी त्याचे लग्न लावून दिले. त्याला चार लहान मुलं आहे. आता त्याच्यानंतर या चार मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचं काय? असा सवाल बाळाच्या निधनानंतर उभा ठाकला आहे.



दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जाते. त्यामुळे कोट्यवधींचा निधी आदिवासीच्या पाणी, वीज, रस्ते, शिक्षण अश्या मूलभूत गरजा उलपब्ध करून देण्यासाठी शासन खर्च करतो. मात्र शासन बाळ्या सिंगर सारखे आदिवासी समाजातील हुन्नरबाज कलाकारांना वाव देताना दिसून येत नाही. ही परिस्थिती बाळ्या सिंगरच्या निधनानंतर समोर आली आहे. यामुळे आदिवासी समाजाचे असलेले शहापूरच्या आजी-माजी आमदारांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे, मत सामजिक कार्यकत्यांनी व्यक्त केले.


बाळ्या सिंगरने शहापूर तालुक्यात नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याला ज्याने आपल्या आवाजाने सर्वांना भूरळ घातली होती. तो एका आदिवासी कुटुंबात शिक्षणापासून वंचित राहिलेला असल्याने मासे विक्रीसाठी गावागावात जाऊन गाणे म्हणत, आपल्या गोड आवाजाने ग्राहकांना भूरळ घालीत असे, क्रिकेटचे सामने आसो कि काही कार्यक्रम बाळ्या सिंगरला आवर्जून आयोजक बोलवत होते. या कार्यक्रमातून आणि मासे विक्रीतुन जेमतेम ४०० ते ५०० रुपये कुटूंबाच्या उपजिविकेसाठी मिळत होते. तरीही स्वतः गायलेल्या गाण्याचा अलबम काढण्याची इच्छा त्याने समाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांच्याकडे व्यक्त केली. त्यासाठी हरणे यांनी पुण्यातील एका संस्थेची संपर्क करुन गाण्याचा अलबम काढण्याचे ठरवले होते.


शहापूर तालुक्यातील पळसपाडा येथील नदीत मासेमारी करत असताना, २७ ऑक्टोंबर रोजी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र त्याच्या मृत्यूने शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे रोजगाराची चिंता न मिटल्याने त्याला आपला जीव गमवावा लागल्याची खंत त्याच्या अंत्यविधीला उपस्थित असलेले चाहते व्यक्त करीत होते. Balya singer

Last Updated : Oct 29, 2022, 8:57 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details