महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना'मुळे रंगाचा बेरंग, चीनमधील रंगांवर 'संक्रात'

यंदाच्या वर्षी दिल्ली येथे झालेला हिंसाचार आणि कोरोनाच्या व्हायरसमुळे रंगांची विक्री होत नसल्याचं विक्रेत्यांनी सांगितले आहे.

By

Published : Mar 7, 2020, 7:13 PM IST

Thane
ठाणे

ठाणे- यंदा धुळवडीच्या दिवशी खेळण्यात येणाऱ्या रंगाच्या खेळाचा 'कोरोना व्हायरस'च्या प्रादुर्भावामुळे बेरंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी बाजारात चीनमधील रंग घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. मात्र, यंदाच्या वर्षी ग्राहकांना रंगाकडेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी विक्री होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

'कोरोना'मुळे रंगाचा बेरंग

हेही वाचा -वीज चोरी प्रकरणी पॉवरलूम मालकाला 5 लाखांच्या दंडाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय

यंदाच्या वर्षी दिल्ली येथे झालेला हिंसाचार आणि कोरोनाच्या व्हायरसमुळे रंगांची विक्री होत नसल्याचं देखील विक्रेते सांगत आहेत. तर बाजारात यंदा देखील विक्रीसाठी लाल, हिरवे आणि पिवळे असे भडक दिसणारे नैसर्गिक रंग आणले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान, भारतात येणाऱ्या अधिकतर पिचकाऱ्यांची आयात चीनमधून केली जाते. पण, यावेळी मात्र चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव असल्याने नव्या पिचकाऱ्यांची आयात झालेली नाही. परिणामी बाजारात जुन्या डिझाइनच्या आणि गेल्या वर्षीच्या पिचकाऱ्यांची विक्री केली जात आहे.

हेही वाचा -लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राखीव उद्यानात राजकीय पक्षांचा कार्यक्रम..

ABOUT THE AUTHOR

...view details