महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 1, 2020, 7:32 PM IST

Updated : Dec 1, 2020, 7:40 PM IST

ETV Bharat / state

'अक्का काका' या नावावरून दरोडा उघडकीस, तिघांना ठोकल्या बेड्या

सोलापूर-विजापूर महामार्गावर 24 नोव्हेंबरला एका दुचाकीस्वारास लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रिक्षा
रिक्षा

सोलापूर- येथील विजापूर महामार्गावर 24 नोव्हेंबरला एका दुचाकीस्वारास लुटले होते. या दरोड्याचा तपास करत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तीन संशयित दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. तसेच 98 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

महादेव विजय शिवशरण (वय 28 वर्षे, रा. भैरू वस्ती, सोलापूर), सुनील उर्फ आनंद काशीनाथ जाधव (वय 23 वर्षे, रा. लिमयेवाडी, सोलापूर), रोहित उर्फ भावड्या पंडित हतुरे (वय 22 वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अक्का काका या नावाच्या रिक्षामधून दरोडेखोर आले होते, अशी तक्रार दाखल केली होती. या विशिष्ट नावावरून पोलिसांनी तीन दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या.

सोलापूर-विजापूर महामार्गावर लुटले होते

24 नोव्हेंबरला श्रीकांत मल्लिकार्जुन ममदापुरे हे दुचाकी वरून हत्तुर (ता. दक्षिण सोलापूर) येथे रात्रीच्या सुमारास सोलापूर-विजापूर महामार्गावरून जात होते. त्यांसोबत मित्र बसवराज पाटील हे देखील होते. चौत्रा नाका येथे त्यांची दुचाकी बंद पडली. रात्र झाली असल्याने त्यांनी मोबाइलच्या उजेडात दुचाकी दुरुस्त करत होते. त्यावेळी हे तिघे संशयित आरोपी एका रिक्षातून आले आणि तुम्ही राँग साईडला (विरुद्ध दिशा) गाडी थांबविली आहे, असे सांगून 500 रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी श्रीकांत ममदापुरे यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी संशयित तिन्ही दरोडेखोरांनी श्रीकांत यांच्या खिशात हात घालून मारहाण करुन त्यांच्या खिशातून मोबाइल काढून घेत तेथून पोबारा केला. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

'अक्का काका' रिक्षाचा शोध घेतला आणि संशयित दरोडेखोर झाले गजाआड

डीबी पथकाचे कर्मचारी हे या दरोड्याचा तपास करताना तक्रारदाराने सांगितलेल्या वर्णनावरुन 'अक्का काका' नाव असलेली रिक्षा शोधली व तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दरोड्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा -विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीस तीन वर्षे कारावास

हेही वाचा -महामार्गावर वाहने अडवून लुटणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

Last Updated : Dec 1, 2020, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details