महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साखर उत्पादनात राज्यात सोलापूर प्रथम

माढ्याच्या विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने १७ लाखांवर क्रशिंग करत राज्यात अव्वल येणाचा मान मिळवला आहे. उजनी धरणातून मिळणाऱ्या पाण्यामुळे सोलापुरातील बरीच शेती ओलिताखाली आली आहे.

By

Published : Mar 24, 2019, 2:15 PM IST

साखर उत्पादनात राज्यात सोलापूर प्रथम

सोलापूर - साखरेच्या उत्पादनात नावलौकीक असलेल्या जिल्ह्याने याहीवर्षीही राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. जिल्ह्यानंतर कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागला आहे.

साखर उत्पादनात राज्यात सोलापूर प्रथम


राज्यात यंदा १९५ साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरला ऊस गाळपास शुभारंभ केला होता. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ कारखान्यांनी १ कोटी ५९ लाख ९६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये १ कोटी ६३ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. त्यात माढ्याच्या विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने १७ लाखांवर क्रशिंग करत राज्यात अव्वल येणाचा मान मिळवला आहे. उजनी धरणातून मिळणाऱ्या पाण्यामुळे सोलापुरातील बरीच शेती ओलिताखाली आली आहे. त्यामुळे उसाच्या पीकामध्ये वाढ झाली असून, उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यामुळे याचा फायदा सोलापूर जिल्ह्याला झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details