महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी शहरातील बालरोग तज्ञांची स्थानिक प्रशासनासोबत बैठक

By

Published : May 16, 2021, 8:02 PM IST

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर व पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी आणि लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. आज सोलापूर शहरातील सर्व बाल रोग तज्ञ यांची एकत्रित बैठक महापालिकेत घेण्यात आली. यात सोलापूर शहरातील बालरोग तज्ञ उपस्थित होते.

Corona Third Wave Pediatrician Meeting Solapur
कोरोना तीसरी लाट बालरोग तज्ञ बैठक सोलापूर

सोलापूर -सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर व पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी आणि लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. आज सोलापूर शहरातील सर्व बाल रोग तज्ञ यांची एकत्रित बैठक महापालिकेत घेण्यात आली. यात सोलापूर शहरातील बालरोग तज्ञ उपस्थित होते.

माहिती देताना महानगरपालिकेचे उपायुक्त आणि बालरोग तज्ञ

हेही वाचा -सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी

शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रात फिवर ओपीडी सुरू करणार

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. लहान मुलांचे फिव्हर ओपीडी शहरात असलेल्या सर्व 15 नागरिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी करण्याबाबत महापालिकेच्या वतीने लवकरच यादी प्रसिद्ध करण्यात येईल. शहरातील लहान मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये वाडिया हॉस्पिटल येथे 50 बाल कोविड बेड, तसेच डफरीन हॉस्पिटल येथे 20 बाल कोविड बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या या दोन्ही लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त प्रभाव जाणवला नाही. त्यात सोलापूर शहरात आता पर्यंत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. पण, तीसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला आहे, त्यामुळे कोरोनाच्या तीसऱ्या लाटेला रोखण्यासाठी विविध उपाययोजना किंवा पूर्वनियोजन केले जात आहे.

सोलापूरमध्ये आजतागायत 3 लहान मुलांचा कोरोनाने मृत्यू

शहरात आजतागायत तीन लहान मुलांचा मृत्यू कोरोना आजाराने झालेला आहे. यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, महापालिका प्रशासन, खासगी हॉस्पिटल हे कोरोनाचा निदान करण्यासाठी तयार आहेत. तरी नागरिकांनी आपल्या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिकेच्या फिव्हर ओपीडी येथे घेऊन यावे, जेणेकरून त्यांची तपासणी करून पुढील उपचार देण्यासाठी सोय करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या मुलांना वारंवार हात धुण्यास, मास्क लावण्यास, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगावे, असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केले.

या बैठकीस डॉ. शिरशेट्टी (अध्यक्ष, बालरोग तज्ञ संघटना) सरिता आरकाल (सचिव, बाल रोग तज्ञ संघटना) डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. नकाते, डॉ. हेमंत साठे, डॉ. किरण पाटील, डॉ. समीर खान, डॉ. विक्रम हिरेकेदार, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. चाफळकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा -रमजान ईदनिमित्ताने गोरगरीब व कोविडग्रस्तांना मदत करा - मुस्लिम धर्मगुरू

ABOUT THE AUTHOR

...view details