महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2020, 7:29 PM IST

ETV Bharat / state

मटका किंग भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी अखेर पोलिसांच्या कोठडीत

सोलापुरात गाजलेल्या मटका बुकी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व भाजपचा नगरसेवक सुनील कामाठीच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे.

सुनील कामाठी
सुनील कामाठी

सोलापूर- सोलापुरात गाजलेल्या मटका बुकी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व भाजपाचा नगरसेवक सुनील कामाठी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला आंध्रप्रदेश येथील विजयवाडा येथून तेलंगणा येथील हैदराबाद येथे जाताना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अ‌ॅड. विनोद सूर्यवंशी यांनी दिली. गेल्या 28 दिवसांपासून सुनील कामाठी हा फरार होता.

माहिती देताना विधिज्ञ

24 ऑगस्ट 2020 रोजी न्यू पाच्छा पेठ येथील एका इमारतीत मटका अड्डा चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या पथकाने मटका बुकीवर धाड टाकली होती. धाडी वेळी पळापळ झाली. या धावपळीत मटका बुकीचे हिशोब तपासणारा हिसोबनिस परवेज इनामदार (रा. साईनाथ नगर, होटगी रोड, सोलापूर) याने मटका अड्ड्याच्या इमारतीवरून उडी मारून पळण्याच्या प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने मटका बुकीचे धाड प्रकरणाला गंभीर वेगळेच वळण लागले होते. जेलरोड पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. पोलिसांनी या कारवाईत ऑनलाइन मटका बुकी प्रकरणात संगणक, लॅपटॉप, हिशोबाच्या डायऱ्या, असा साहित्य जप्त केला होता.

गुन्हे शाखेने न्यू पाच्छा पेठ येथील मटका बुकीचा सखोल तपास करत आरोपींचा शोध घेतला. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून भाजपचा नगरसेवक सुनील कामाठी याचे नाव समोर आले होते. घटना झाल्याच्या दिवासापासून सुनील कामाठी फरार होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल तपास करत त्यामध्ये सहभागी असणाऱ्या 288 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर असलेल्या स्टीफन स्वामी याचे देखील या मटका व्यवसायात हात असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून त्यावर कारवाई केली आहे.

पण, 24 ऑगस्टपासून मटका किंग सुनील कामाठी फरार होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका संशयित आरोपीकडून माहिती घेत आंध्र प्रदेश येथील विजयवाडा शहर गाठले होते. याची कुणकुण लागताच तो हैदराबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे त्याच्या मुसक्या आवळल्या. सकाळी 10 च्या सुमारास कामाठीला सोलापूरात आणण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने कामाठीला 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


गुन्हे शाखेचा 28 दिवसांचा शोध

सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने मटका बुकी चालक सुनील कामाठीला पकडण्यासाठी शोध सुरू केला होता. त्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई स्टीफन स्वामी हा मोठा मासा देखील गळाला लागला होता. त्याला अटक करुन त्यावर बडतर्फीची कारवाई झाली. त्यानंतर इस्माईल मुच्छाले याला देखील अटक करण्यात आले आहे. या तिघांच्या भागीदारीत हा मटका व्यवसाय चालत होता. जवळपास महिन्याला 2 कोटींची उलाढाल यामधून होत होती. तसेच यामध्ये सुनील कामाठीचा पुतण्या आकाश कामाठी याला देखील अटक झाली होती. त्याच्या घराची झडती घेऊन त्याची संपत्ती जप्त करण्याचा विचार पोलीस करत होते. यामध्ये 288 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर 65 संशयित बुकी चालकांना व चिट्टी धारकांना अटक केले आहे.

हेही वाचा -सोलापुरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण, दुकानांसह एटीएम फोडले

ABOUT THE AUTHOR

...view details