महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारी दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर; विद्यापीठातील क्रीडा महोत्सवाचे करणार उद्घाटन

आज सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवासाठी राज्यभरातील साडे तीन हजार खेळाडू आणि त्यांचे संघ व्यवस्थापक विद्यापीठात दाखल झाले आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित असणार आहेत.

By

Published : Dec 26, 2019, 2:57 AM IST

solapur
राज्यपाल कोश्यारी

सोलापूर- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसांसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या हस्ते आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित 23 व्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर, शुक्रवारी पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

आज सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवासाठी राज्यभरातील साडे तीन हजार खेळाडू आणि त्यांचे संघ व्यवस्थापक विद्यापीठात दाखल झाले आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पहिल्यांदाच राज्यपाल कार्यालयामार्फत राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये राज्यातील 20 विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. शुक्रवारी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडणार आहे.

हेही वाचा-कासेगावात यल्लमादेवीची यात्रा; यात्रेसाठी ५ हजार जोगती दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details