महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढ्यात रावरंभाराजे निंबाळकरांची पुण्यतिथी साजरी - आकर्षक फुलांची आरास

माढा शहराला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त करुन देणारे राजे रावरंभा निंबाळकर यांची २८३ वी पुण्यतिथी माढा शहरात प्रथमच साजरी करण्यात आली. नगरसेवक आणि शहरवासियांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी आकर्षक फुलांची आरास समाधीस्थळी करण्यात आली होती.

माढ्यात रावरंभाराजे निंबाळकरांची पुण्यतिथी साजरी

By

Published : Nov 24, 2019, 5:05 PM IST

सोलापूर- माढा शहराला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त करुन देणारे राजे रावरंभा निंबाळकर यांची २८३ वी पुण्यतिथी माढा शहरात प्रथमच साजरी करण्यात आली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे आणि नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या पुढाकारातून शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला.

शहरातील साठे गल्ली प्रभागात असलेल्या रावरंभाराजे निंबाळकर यांच्या समाधी स्थळी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरसेवक आणि शहरवासियांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी आकर्षक फुलांची आरास समाधी स्थळी करण्यात आली होती.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा साठे म्हणाल्या, रावरंभा निंबाळकर राजेंचे माढ्यासाठी मोठे योगदान असून त्यांचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. यासोबतच यापुढे दरवर्षी पुण्यतिथी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माढ्यात रावरंभाराजे निंबाळकरांची पुण्यतिथी साजरी

माढ्याची जहागिरी असलेल्या राजे निंबाळकर यांच्या निधनाची पेशवे दप्तरात तिथीनुसार तारीख इतिहास संशोधक प्रा.सतिश कदम यांना संशोधनातुन सापडली आहे. प्रा. कदम हे रावरंभा निंबाळकर राजेच्या जीवनचरित्रावर पुस्तक लिहित आहेत. साठे गल्लीत असलेल्या रावरंभा निंबाळकर राजेंच्या समाधी स्थळाचे लवकरच सुशोभिकरण करणार असून समाधी स्थळी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details