महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरात 2 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

भ्रष्टाचार रोखण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात 'दक्षता सप्ताह 2020' किंवा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आयोजन केले आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या या सप्ताहात नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

By

Published : Oct 28, 2020, 2:15 PM IST

Solapur anti corruption
सोलापूरात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

सोलापूर-भ्रष्टाचार रोखण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात 'दक्षता सप्ताह 2020' किंवा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आयोजन केले आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या या सप्ताहात नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

सप्ताहाची सुरुवात

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. समाजातील निष्कलंक स्वयंसेवी संस्था, अशासकीय संघटना, सेवाभावी संस्था तसेच सामान्य नागरिकांना दक्षता जागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन संबंधीचे स्टिकर वाहनांवर लावण्यात येणार आहे.

जनतेचे सहकार्य

या दरम्यान जनतेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाविषयी जनजागृती केली जाणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात सार्वजनिक ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन संबंधीचे भित्तीपत्रके व फलक लावण्यात येणार आहेत. तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन संबंधी माहिती पत्रके वाटून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती अँटी करप्शन ब्युरोचे उपधीक्षक संजीव पाटील यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details