महाराष्ट्र

maharashtra

मोहोळमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या

By

Published : Jan 6, 2021, 11:29 PM IST

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, भूषण धनंजय पडवळकर (रा. देशमुख गल्ली मोहोळ) याचे वैष्णवी नामदेव थोरे (वय, १७ वर्षे) (रा. स्टेशन रोड, मोहोळ) या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. भूषण हा शेती करत होता. तर, वैष्णवी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.

A loving couple committed suicide in Mohol taluka
मोहोळ येथे प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या

सोलापूर - मोहोळ शहरात एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहराजवळील बी.पी. एड कॉलेजमधील झाडाला एकाच स्कार्फने घेत या युगुलाने आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारी ३च्या दरम्यान ही घटला घडली. तालुक्यात ही तिसरी घटना आहे.

कॉलेजच्या आवारातील चिंचेच्या झाडाला गळफास -

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, भूषण धनंजय पडवळकर (रा. देशमुख गल्ली मोहोळ) याचे वैष्णवी नामदेव थोरे (वय, १७ वर्षे) (रा. स्टेशन रोड, मोहोळ) या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. भूषण हा शेती करत होता. तर, वैष्णवी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. मंगळवारी ६ जानेवारी रोजी दुपारी ३च्या दरम्यान भूषण व वैष्णवी या दोघांनी मोहोळ- वडवळ रोडवर असलेल्या बी.पी.एड. कॉलेजच्या परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला एकाच स्कार्फ ने गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

भरदिवसा केली आत्महत्या -

मंगळवारी दुपारी घडलेल्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईक व पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर दोघांचेही मृतदेह शासकीय दवाखान्यांमध्ये नेण्यात आले.

मोहोळमधील तिसरी घटना -

मोहोळ तालुक्यात प्रेमी युगुलांनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एका प्रेमी युगुलाने नरखेड परिसरात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. तर, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने एका पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतला होता. आज मंगळवारी मोहोळ तालुक्यात तिसरी घटना घडली आहे. जवळपास सहा महिन्यांत तीन जोडप्यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे.

हेही वाचा - बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर ५० टक्के सवलत मिळणार

ABOUT THE AUTHOR

...view details