महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 23, 2022, 9:02 PM IST

ETV Bharat / state

Global Teacher Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींना 153 दिवसांची रजा मंजूर, जिल्हा शिक्षण विभागाची नमती भूमिका

सोलापूर शहर जिल्हा आणि महाराष्ट्रभर चर्चा होत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशातील अध्ययनसाठी अखेर रजा मंजूर झाली आहे. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंत अशी 153 दिवसांची रजा त्यांना मिळाली आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले ( Global Teacher Ranjitsinh Disale ) यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी आता जाता येणार आहे.

डिसले गुरुजी
डिसले गुरुजी

सोलापूर- सोलापूर शहर जिल्हा आणि महाराष्ट्रभर चर्चा होत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशातील अध्ययनसाठी अखेर रजा मंजूर झाली आहे. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंत त्यांना रजा मिळाली आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले ( Global Teacher Ranjitsinh Disale ) यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी आता जाता येणार आहे. शिक्षण विभागाने नुकतीच त्यांची अध्ययन रजा मंजूर केली ( Leave Sanction to Global Teacher Ranjitsinh Disale ) आहे. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 153 दिवसांसाठी त्यांना रजा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी यांनी तयार केलेल्या चौकशी अहवालावर पडदा टाकून सुटी मंजूर केल्याचीही चर्चा सुरू आहे. शिक्षण विभागामार्फत नमती भूमिका घेतल्याने डीसले यांना रजा मंजूर झाली आहे.

सुटीच्या दिवशी रजा मंजूर -ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर परदेशात अध्ययनासाठी जाण्याकरता डिसले यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यांच्याबद्दल एक चौकशी अहवालही समोर आला होता. 2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र, या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झाला होता. पण, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डिसले यांना अध्ययनासाठी परदेशात पाठवण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण विभागाने म्हणजेच रविवारी सुटीच्या दिवशी काम करुन डिसले गुरुजींची रजा मंजूर केली आहे.

फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी रजा मंजूर -सोलापूर शिक्षण विभागाने नुकतीच ही माहिती दिली असून या माहितीत डिसले यांना अमेरिकन सरकारच्या फुलब्राईट फॉरेन स्कॉलरशिप बोर्ड स्कॉलरशीपसाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात आल्याचे कळवले आहे. यामध्ये त्यांना 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 153 दिवसांसाठी रजा देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details