महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 12, 2021, 5:19 PM IST

ETV Bharat / state

छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळी उदयनराजे भोसलेंनी केले अभिवादन

छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळी खासदार उदयनराजे भोसलेंनी अभिवादन केले. यावेळी अभिवादनासाठी वढु बुद्रुकचे सर्व ग्रामस्थ, शंभूभक्त उपस्थित होते.

अभिवादन करताना खासदार उदयनराजे भोसले.
अभिवादन करताना खासदार उदयनराजे भोसले.

सातारा -छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वढु बुद्रुक (पुणे) येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथीचे कार्यक्रम स्थानिक पातळीवर करण्यात आले होते.

बलिदान स्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो शंभूभक्त वढु बुद्रुक येथील समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी जात असतात. या ठिकाणी दरवर्षी राज्याच्या विविध भागातून शंभूज्योत आणत असतात. पहाटे छत्रपती संभाजी महारांजाच्या समाधी स्थळावर नित्यनियमाने होणारी पूजा ग्रामस्थांनी केली.

महाराजांच्या समाधीवर जलाभिषेक करुन अभिवादनाला सुरूवात झाली. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रथेप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांनी महाराजांची प्रार्थना करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी कवी कलश यांच्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेऊन महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते समाधी परिसरात रक्तचंदन आणि अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॅा सचिन पुणेकर यांनी या वृक्षाचे महत्व सांगितले. त्याचबरोबर या वृक्षारोपणासाठी विविध नद्यांतून पाणी आणल्याचे मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. अभिवादनासाठी वढु बुद्रुकचे सर्व ग्रामस्थ, शंभूभक्त उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details