महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टँकरने धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, ड्युटीवर जात असताना झाला अपघात

टँकरने मोटरसायकला धडक दिल्याने कुरळप पोलीस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला. इस्लामपूर- वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला आहे.

By

Published : May 9, 2019, 8:57 PM IST

टँकरने धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सांगली- टँकर आणि दुचाकीच्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अजय सुतार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते कुरळप पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ड्युटीवर हजर राहण्यासाठी जात असताना इस्लामपूर नजीक हा अपघात झाला.

टँकरने मोटरसायकला धडक दिल्याने कुरळप पोलीस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला. इस्लामपूर- वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला आहे. सुतार हे ड्युटीसाठी इस्लामपूरहून कुरळपला चालले होते. यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते बाहेर पडत असताना वाघवाडीकडे चाललेल्या एका भरधाव टँकरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेल्मेट असतानाही डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. अजय सुतार हे एक महिन्यापूर्वी सांगलीहुन इस्लामपूरला वास्तव्यास आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details