सांगली - सकल मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकारकडून पूर्णपणे काढले जाणार आहेत. त्याच्या प्रक्रियेस सुरूवात केली आहे. मात्र, त्याला वेळ लागेल, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. राज्यात बेरोजगारी वाढली नाही, आणि निवडणूक वर्षात मोर्चे निघतात, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला. ते आज रविवारी सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे १०० टक्के मागे घेणार - चंद्रकांत पाटील
सकल मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकारकडून पूर्णपणे काढले जाणार आहेत. त्याच्या प्रक्रियेस सुरूवात केली आहे.
पंढरपूर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत भिडे गुरुजींच्या वरील गुन्हे मागे घेतले, त्याप्रमाणे तातडीने गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भाजपवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाटील यांनी पुढे म्हणाले, राज्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलना दरम्यान दाखल झालेले गुन्हे हे राज्य सरकारकडून शंभर टक्के काढले जाणार आहेत. असा खुलासा मंत्री पाटील यांनी केला. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्या प्रक्रियेला वेळ लागेल. असे मत व्यक्त करत, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर दाखल झालेला दहा वर्षापूर्वीचा गुन्हा मागे घेतला आहे, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. राज्यातील बेरोजगारी वाढल्याच्या आरोपाबाबत बोलताना राज्यात बेरोजगारी वाढली नाही, असे स्पष्ट करत निवडणूक वर्षात मोर्चे निघतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यात निघणाऱया 'जॉब दो' मोर्चाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.