महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 15, 2021, 9:22 AM IST

ETV Bharat / state

ऑनलाइन कर्जाच्या आमिषाने लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

ऑनलाइन फसवणुकिच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर येत आहे. अनेकदा सुशिक्षित नागरिकही आमिषाला बळी पडतात. मिरजमध्ये ऑनलाइन कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला १ लाख ८ हजारांना फसवले आहे.

सायबर क्राईम
cyber crime

सांगली - मिरजेमध्ये ऑनलाइन कर्ज देतो म्हणून एका व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या ऑनलाइन फसवणूकी प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी रमेश निकम या आरोपीला अटक केली आहे.

कर्जाच्या अमिषाने लाखोंची फसवणूक -

मिरज तालुक्यातील बोलवाड येथील सचिन बरगाले या व्यक्तीची काही दिवसांपूर्वी फसवणूक झाल्याचा प्रकार घडला होता. रमेश निकम या व्यक्तीने बारगाले यांना फोनवरुन ऑनलाइन कर्ज पाहिजे का? अशी विचारणा केली होती. त्यानंतर बरगाले यांनी होकार दिला. आरोपी निकम याने आपली 'लोडींग' नावाची कंपनी आहे, त्याच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी व्यवस्थापकाला खुश करण्यासाठी पैसे द्यावे लागतील,असे सांगतीले. बरगाले यांनी उद्योगासाठी 14 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. या ऑनलाइन कर्जासाठी वेळोवेळी बरगाले यांच्याकडून 1 लाख 8 हजार रुपये ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आले. मात्र, त्यानंतर बरगाले यांना कर्ज काही मिळेल नाही. त्यांची फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यानंतर बरगाले यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार मिरज शहर पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी येथील रमेश निकम याला ऑनलाइन कर्ज देण्याच्या बहाण्याने 1 लाख 8 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक केली, असल्याची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details