महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 1, 2021, 10:56 AM IST

ETV Bharat / state

दुर्मिळ मांडूळ विक्री करणारी टोळी जेरबंद, 25 लाखांचे 3 मांडूळ साप जप्त

कवठेमहांकाळ शहरात दुर्मिळ असणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करणारी एक टोळी कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केली आहे. सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

दुर्मिळ मांडूळ विक्री करणारी टोळी जेरबंद
दुर्मिळ मांडूळ विक्री करणारी टोळी जेरबंद

सांगली - कवठेमहांकाळ या ठिकाणी दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन मांडूळ साप जप्त करण्यात आले आहे. धन-दौलत व ऐश्वर्या मिळेल, अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत होती.

मांडूळ विक्री करणारी टोळी जेरबंद

कवठेमहांकाळ शहरात दुर्मिळ असणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करणारी एक टोळी कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केली आहे. सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या टोळीकडून 3 दुर्मिळ असणारे मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत अंदाजे 25 लाख इतकी असल्याचा समोर आला आहे. गजानन सरगर, अशोक ओलेकर, तिप्पणा पडवळे, महादेव बेनाडे, विवेक बेनाडे, युवराज मगदूम यांना अटक झाली आहे.

मांडूळमुळे मिळते धन-दौलत !
या सापांमुळे धन-दौलत मिळते,अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करत विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील मेघराज मंदीर याठिकाणी सापळा रचून साप विक्रीसाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला अटक करत त्यांच्या ताब्यातील दुर्मिळ मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहेत. तर सहा जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात वन कायद्या अंतर्गत अवैधरित्या साप बाळगणे व तसेच लोकांची फसवणूक करण्याचा उद्देश,असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -कोरोना महामारीत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल रोहित शेट्टी यांचा सत्कार!

ABOUT THE AUTHOR

...view details