महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावधान..! गुलाबजाम खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा

रत्नागिरीत गुलाबजाममध्ये अळ्या तर गुलाबजामच्या पाकात माशा तरंगताना आढळून आल्या आहेत.

By

Published : Apr 2, 2019, 5:36 PM IST

Updated : Apr 2, 2019, 8:43 PM IST

गुलाबजाममध्ये निघाल्या अळ्या

रत्नागिरी- येथील राजापूर तालुक्यातील ओणी गावातल्या 'भवानी शंकर स्वीट अॅण्ड फरसाण मार्ट' मध्ये चक्क गुलाबजामध्ये अळ्या तर गुलाबजामच्या पाकात माशा तरंगताना आढळून आल्या आहेत. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित दुकानावर कारवाईदेखील करण्यात आली आहे.

गुलाबजाममध्ये निघाल्या अळ्या

तुमच्या बहुतेकांची आवडती स्वीट डिश गुलाबजाम हीच असेल. पण आता गुलाबजाम स्वीटमार्टमधून खरेदी करत असाल तर खाताना १० वेळा विचार करा. कारण राजापूर तालुक्यातील ओणी गावातल्या भवानी शंकर स्वीट अॅण्ड फरसाण मार्टमधल्या गुलाबजाममध्ये चक्क अळ्या आणि पाकात माशा तरंगताना आढळून आल्या आहेत. अमित जैतापकर हे या दुकानात शीतपेय पिण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांना या दुकानात हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यांनी हा संपूर्ण प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये शुट केला. या दुकानात ज्या गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणी मिठाई बनवली जात होती, त्या ठिकाणचेही चित्रिकरण अमित यांनी केले आहे. या संपूर्ण खटनेनंतर दुकान मालकाची भंबेरी उडाली आहे.

गुलाबजामबद्दल या किळसवाण्या प्रकाराबद्दल अमित जैतापकर यांनी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली. ज्याठिकाणी मिठाई तयार केली जात होती. त्याठिकाणी मिठाई तयार करण्याचा परवाना या मिठाई दुकानाकडे नव्हता. त्यामुळे मिठाई बनवण्याचे ठिकाण अन्न औषध प्रशासनाकडून सील करण्यात आले. तर संबंधित गुलाबजाम तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.

एकूणच आपण जे पदार्थ बाहेर विकत घेऊन खातो ते अनेकदा व्यवस्थित नसतात. त्यामुळे त्यांची चाचपणी करणे आवश्यक आहे.

Last Updated : Apr 2, 2019, 8:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details