महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यातील खोरनिनको धबधबा झाला प्रवाहित

लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधबा सध्या प्रवाहीत झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांज्यापासून 24 किमीवर हा खोरनिनको धबधबा आहे. हा धबधबा नेहमीच पर्टकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते.

By

Published : Jun 19, 2020, 9:07 PM IST

Breaking News

रत्नागिरी - कोकणात पाऊस झाला की धबधबे प्रवाहीत होतात. कडेकपारीतून फेसाळणारे धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करत असतात. असाच लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधबा सध्या प्रवाहीत झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांज्यापासून 24 किमीवर हा खोरनिनको धबधबा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खोरनिनको धबधबा झाला प्रवाहित


पाऊस सुरू झाला की, कोकणचं निसर्गसौंदर्य आणखी खुलून दिसतं. त्यात कड्याकपायऱ्यातून वाहणारे धबधबे अनेकांचं लक्ष वेधून घेतात. खोरनिनको हा धबधबा सुद्धा असाच आहे. गर्द झाडी आणि फेसाळणारा हा धबधबा लक्ष वेधून घेणारा आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे सध्या या ठिकाणी कोणी फारसं फिरकत नाही. कोरोनामुळं कोकणातील वर्षा पर्यटनावर देखील याचा परिणाम झालेला दिसून येतो. वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटक कोकणात येतात, यावर्षी मात्र हे धबधबे शांतच आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details