रत्नागिरी -संसदेमध्ये ज्यावेळी हा शेतकरी कायदा मांडला गेला, त्याला पाठिंबा दिला गेला, त्यानंतर भूमिका कशी बदलते. काही पक्ष तटस्थ राहिले आणि सध्या विरोध कसे करू शकतात, असा सवाल भाजप नेते विनोद तावडेंनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे नाव न घेता तावडेंनी सेनेला फटकारले आहे. ते मंगळवारी (दि. 8 डिसें.) रत्नागिरीत बोलत होते.
तशाच पद्धतीची ही भेट
अकाली दलाचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून विनोद तावडेंनी दोन्ही पक्षांवर निषाणा साधला आहे. जसे ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले होते, तशाच पद्धतीची ही भेट आहे. शेवटी ज्यावेळी विरोधी पक्षाला मोदी सरकारला विरोध करायला संधी मिळत नाही, त्यावेळी ते संधीच्या शोधात असतात, असे यावेळी तावडे म्हणाले.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे विधान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे खंडण तावडे यांनी केले आहे. ते म्हणाले, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे ऑपरेशन लोटसबाबत काहीच पुरावे नाहीत. पुरावे नसताना केलेले वक्तव्य केवळ विरोधकच करतात, असे म्हणते तावडे यांनी गहलोत यांच्यावर निशाणा साधला.
पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंदोलनातले विषय म्हणून पाठींबा देणे असू शकते. पण, या विषयामध्ये ज्या पद्धतीने आवाहन केले जाते त्याची गरज नाही, असे म्हणत तावडेंनी साहित्यिक तसेच क्रीडापटूंना पुरस्कार परत न करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -'शिवसेना-राष्ट्रवादी सारख्या विरोधकांना हा विषय चिघळवायचा आहे'
हेही वाचा -भारत बंद.. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प