रत्नागिरी -गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 685 कोरोनाबाधित आढळले आहे. 685 पैकी 424 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 261 रुग्ण अँँटीजेन चाचणी केलेले आहेत. तर जिल्ह्यात तब्बल 11 कोरोनारुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तब्बल 685 नव्या रुग्णांची भर
जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, सोमवारी संख्या कमी झाली होती. मात्र मंगळवारी पुन्हा कहर झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 24 तासात 685 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 16 हजार 574 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 424 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 261 रुग्ण अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 685 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 152, दापोली 162, खेड 55, गुहागर 34, चिपळूण 95, संगमेश्वर 166, मंडणगड 8, राजापूर 2 आणि लांजा तालुक्यात 11 रुग्ण आढळले आहेत.
11 जणांचा मृत्यू
तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 11 रुग्णांचा बळी गेला आहे. तर जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 475 एवढी झाली आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.86 % आहे.
रत्नागिरीमध्ये 685 कोरोनाबाधितांची वाढ, 11 रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरीमध्ये मंगळवारी कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात 685 कोरोनाबाधित आढळले आहे. 685 पैकी 424 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 261 रुग्ण अँँटीजेन चाचणी केलेले आहेत.
कोरोनाबाधितांची वाढ