महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 18, 2020, 11:56 PM IST

ETV Bharat / state

#COVID-19 : खबरदारीसाठी कोकण रेल्वेची स्थानके चकाचक

दरम्यान, रत्नागिरी, चिपळूण आणि सिंधुदूर्गातील कणकवली रेल्वे स्थानकावर थेट फलाटावरच हात धुण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी साबण, डेटॉल, सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे.

स्वच्छता करताना कर्मचारी
स्वच्छता करताना कर्मचारी

रत्नागिरी- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोकण रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत आहे. कोकण रेल्वे प्रवाशांचा ज्या ठिकाणी हाताचा संपर्क येईल, त्या ठिकाणची साफसफाई केली जात आहे.

बोलताना प्रतिनिधी

सरकत्या जिन्यावर प्रवाशांचा स्पर्श होणाऱ्या ठिकाणांची सफाई केली जात आहे. तर रेल्वे स्थानकाचीही स्वच्छता केली जात आहे. रेल्वे फलाटावरील प्रवाशांची बसण्याची ठिकाणेसुद्धा स्वच्छ करण्यात आली आहेत.

दरम्यान, रत्नागिरी, चिपळूण आणि सिंधुदूर्गातील कणकवली रेल्वे स्थानकावर थेट फलाटावरच हात धुण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी साबण, डेटॉल, सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे.

त्याप्रमाणे सध्या रेल्वेमधील पडदे काढण्यात आले आहेत. तर प्रवाशांना देण्यात येणारे रेल्वेमधील ब्लॅकेट बंद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात कोकण रेल्वेच्या सर्वच रेल्वे फलाटावर हात धुण्यासाठी सॅनिटायझर पुरवले जाणार आहेत. रत्नागिरीच्या रेल्वे फलाटावरून कोकण रेल्वे कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा -COVID 19 : कोकण रेल्वेची विदेशी प्रवाशांवर करडी नजर

ABOUT THE AUTHOR

...view details