महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार पावसाने नदीचा प्रवाह बदलला; 200 एकर भातशेती धोक्यात

भातशेती लावण्याचे कामे नुकतीच संपलेले आहेत. पाऊस झाल्यामुळे पीके देखील तरारत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नदीचा मुळ प्रवाह बदलला गेला. नदी थेट भात पिकांच्या शेतातून वाहत आहे. त्यामुळे भातशेतीची वाताहत झाली आहे.

By

Published : Jul 25, 2019, 6:38 PM IST

नदीने प्रवाह बदलल्यामुळे भातशेती धोक्यात

रत्नागिरी- गेल्या काही दिवसांपासून कोकणात सातत्याने पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह देखील बदलला आहे. परिणामी २०० एकरवरील भातशेती धोक्यात आली आहे.

नदीने प्रवाह बदलल्यामुळे भातशेती धोक्यात

भातशेती लावण्याचे कामे नुकतीच संपलेले आहेत. पाऊस झाल्यामुळे पीके देखील तरारत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नदीचा मुळ प्रवाह बदलला गेला. नदी थेट भात पिकांच्या शेतातून वाहत आहे. त्यामुळे भातशेतीचा वाताहत झाली आहे. पावसाचा जोर कमी होवून देखील सध्या नदीचा बदललेला प्रवाह तसाच आहे. भात हे गावातील मुख्य पीक आहे. मात्र, आता शेतातूनच थेट नदी वाहू लागल्याने खायचे काय? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रशासनाकडे नुकसानीची पाहणी करण्यात आली. मात्र, येथील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि या नदीतील गाळ उपसला जावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे कोंड्ये गावच्या सरपंच पूनम देसाई यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details