महाराष्ट्र

maharashtra

लांजा नगरपंचायतीसाठी आज मतदान; 58 उमेदवारांचे 'देव पाण्यात'

लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच निवडणूक होत असून यासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

By

Published : Jan 9, 2020, 8:11 AM IST

Published : Jan 9, 2020, 8:11 AM IST

lanja nagarpanchayat election
लांजा नगरपंचयतीच्या सार्वत्रिक निवडणुकिसाठी आज मतदान होणार आहे

रत्नागिरी - लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच निवडणूक होत असून यासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर, 17 नगरसेवक पदांसाठी तब्बल 58 उमेदवार नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी लांज्यातील 13 हजार 239 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून राजेश राणे, भाजपकडून सुमंत वाघदरे, शिवसेनेकडून मनोहर बाईत हे राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत. यांसह भाजपचे बंडखोर रुपेश गांगण व राष्ट्रवादीच्या संपदा वाघधरे हे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा:बोगस पदवी प्रकरण : मंत्री उदय सामंत यांची विनोद तावडेंकडून पाठराखण

सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान मतदान पार पडणार असून एकूण 17 प्रभागांसाठी 18 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचादेशव्यापी बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद; जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

संबंधित प्रकिया पार पाडण्यासाठी 90 निवडणूक कर्मचारी, 18 पोलीस, 3 झोनल अधिकारी आणि 12 राखीव मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार बाबर यांनी दिली. मतमोजणी शुक्रवारी (दि.10 जानेवारी)ला होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details