महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2020, 4:16 PM IST

ETV Bharat / state

गळती लागलेल्या पन्हाळे धरणाची खासदार विनायक राऊत यांच्याकडून पाहणी

राऊत यांनी धरणाच्या दुरुस्तीसाठी उपायोजनांचा आढावा घेतला. धरणाला धोका नसल्याची हमी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. धरणाच्या पाण्याच्या गळतीवर बारीक लक्ष्य ठेवण्याच्या सूचना त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत

रत्नागिरी - लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणाला लागलेल्या गळती प्रकरणाची गंभीर दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली आहे. काल (२१ ऑक्टोबर) दुपारनंतर त्यांनी या धरणाची पाहणी केली. धरणाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला. यावेळी पाहणीनंतर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धरणातील पाणीसाठा त्वरीत कमी करण्याचे आदेश दिले.

माहिती देताना खासदार विनायक राऊत

राऊत यांनी धरणाच्या दुरुस्तीसाठी उपायोजनांचा आढावा घेतला. धरणाला धोका नसल्याची हमी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. धरणाच्या पाण्याच्या गळतीवर बारीक लक्ष्य ठेवण्याच्या सूचना त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सोमवारी (१९ ऑक्टोबर) पन्हाळे धरणाला गळती लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी रात्र जागून काढली होती. प्रशासकीय यंत्रणेचीही धावपळ उडाली होती.

हेही वाचा-राजापूरमधील प्रसिद्ध महाकालीचं मंदिर भाविकांसाठी बंदच

ABOUT THE AUTHOR

...view details