महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2019, 1:43 PM IST

ETV Bharat / state

चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेची खुशखबर; तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खुशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या आणि नेहमीच गर्दी असणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ

रत्नागिरी -कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खुशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या आणि नेहमीच गर्दी असणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण 4 डबे वाढवण्यात आले असून, 11 नोव्हेंबरपासून डबे कायमस्वरुपी जोडले जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ

हेही वाचा - काँग्रेसचे आमदार राहणार पिंक सिटी जयपूरमध्ये; आज होणार रवाना?

तुतारी एक्सप्रेस ही आगोदर १५ डब्यांची होती. तर ती आता 19 डब्यांची झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असतात. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवली आहे. चार डब्यांमध्ये एक थ्री टियर एसी, एक स्लीपर आणि दोन जनरल डबे अधिक जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता तुतारी एक्सप्रेसमध्ये एक टू टियर एसी, दोन त्री टियर एसी, 8 स्लीपर कोच, 6 जनरल डबे आणि 2 एसएलआरचा समावेश आहे.

हेही वाचा - पनवेलमध्ये 14 मजली इमारतीला आग, जीवितहानी नाही

ABOUT THE AUTHOR

...view details