महाराष्ट्र

maharashtra

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारला अपघात; तीन जखमी

By

Published : Dec 19, 2020, 9:12 AM IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. आज पहाटे पुन्हा एक अपघात झाला. या कार अपघातात तीघेजण जखमी झाले आहेत.

Accident
अपघात

रायगड -मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवारी) सकाळी एक अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला दिलेल्या धडकेत कारमधील तिघेजण जखमी झाले. जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक्सप्रेस ग्रँड मॉल समोर हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसली कारचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग पोलीस आणि अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या संस्थेचे सदस्य वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना तातडीने मदत उपलब्ध झाली. अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली.

ABOUT THE AUTHOR

...view details