महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 17, 2020, 12:32 PM IST

ETV Bharat / state

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; एक ठार तर तिघे गंभीर

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. दिनेश सालेकर (वय-42) यांचा जागीच मृत्यू झाला असून पूनम सालेकर व लता सालेकर या मायलेकी गंभीर जखमी आहेत.

severe accident on mumbai pune expressway near khopoli
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे.

रायगड: मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. खोपोलीच्या हद्दीत काही अंतरावर एक इको कार थांबली होती. यावेळी पाठी मागून येणाऱ्या वॉल्व्हो बसने तिला जोरदार धडक दिली. पहाटे 5 च्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने शोल्डर लेनवर ही कार थांबली होती. यावेळी संबंधित प्रकार घडला आहे.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे.

दिनेश सालेकर (वय-42) यांचा जागीच मृत्यू झाला असून पूनम सालेकर व लता सालेकर या मायलेकी गंभीर जखमी आहेत. तसेच नागेश राव हा प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचले. जखमींना त्वरित पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. एक्सप्रेसवे वर वाहने थांबवू नयेत, असा नियम असताना देखील तो चालकांकडून पाळला जात नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details