महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 1, 2019, 5:56 PM IST

ETV Bharat / state

रायगड काँग्रेसतर्फे पंतप्रधानासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोपी आमदार सेंगर यांच्या प्रतिमांची होळी

उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी अलिबाग काँग्रेसने रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अलिबाग तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार कुलदीप सिंह सेंगर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांची होळी करण्यात आली.

रायगड काँग्रेसतर्फे पंतप्रधानासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोपी आमदार सेंगर यांच्या प्रतिमांची होळी

रायगड­ -उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी अलिबाग काँग्रेसने रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अलिबाग तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार कुलदीप सिंह सेंगर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांची होळी करण्यात आली.

रायगड काँग्रेसतर्फे पंतप्रधानासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोपी आमदार सेंगर यांच्या प्रतिमांची होळी

अलिबागमधील काँग्रेस भवन कार्यालयासमोर तालुका व जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमदार सेंगर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी 'मोदी सरकार हाय हाय, योगी सरकार हाय हाय' या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आमदार सेंगर यांच्या प्रतिमा जाळून या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा अॅ़ड. श्रद्धा ठाकूर, युवक जिल्हाध्यक्ष अॅ़ड. प्रथमेश पाटील, तालुका अध्यक्ष योगेश मगर, अलिबाग मुरुड, विधानसभा युवक अध्यक्ष अॅ़ड. कौस्तुभ पुणेकर, प्रभाकर राणे, आकाश राणे आदी कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details