महाराष्ट्र

maharashtra

पेणमध्ये प्लास्टिक बंदीसह मास्क बंधनकारक

By

Published : Jan 12, 2021, 4:38 PM IST

रायगड जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार स्वच्छता अभियान अंतर्गत, पेण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात प्लास्टिक बंदीसह, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आज नगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

पेणमध्ये प्लास्टिक बंदीसह मास्क बंधनकारक
पेणमध्ये प्लास्टिक बंदीसह मास्क बंधनकारक

पेण -रायगड जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार स्वच्छता अभियान अंतर्गत, पेण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात प्लास्टिक बंदीसह, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आज नगरपालिकेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

शहरातील व्यापारी, दुकानदार यासह फेरीवाले यांनी प्लास्टिक तसेच प्लास्टिक अंतर्गत येणारे थर्माकॉल यांचा कोणताही वापर करू नये. शासनाच्या स्वच्छ मोहिमेच्या माध्यमातून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सदर गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता शहरात येणाऱ्या नागरीकांनी व दुकानदार, व्यापाऱ्यांनी मास्क वापरावे. असे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पेणमध्ये प्लास्टिक बंदीसह मास्क बंधनकारक

प्लास्टिक आढळून आल्यास दंड

नगरपालिकेच्या हद्दीत उद्यापासून कोणतीही व्यक्ती विनामास्क फिरताना आढळून आल्यास, तसेच प्लास्टिकचा वापर होत असल्यास नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील टपरी, दुकाने, हातगाडीवाले व इतर फेरीवाले यांच्याकडे प्लास्टिक पिशवी आढळून आली, तर अशा व्यक्तींवर पहिल्या गुन्ह्यास 5 हजार रूपये, दुसऱ्या गुन्ह्यास 10 हजार रुपये व तिसऱ्या गुन्ह्यास 25 हजार रुपये व 3 महिने कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिकबंदीसह शहरात विनामास्क व्यक्ती फिरताना आढळून आल्यास त्याच्याकडून देखील दंड वसूल केला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details