महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2019, 1:51 PM IST

ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर एसटी उलटली; ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना

बोरीवलीपासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याला जाणाऱ्या एसटीचा मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल जवळ अपघात झाला आहे. भोकरपाडा येथील वळणावर ब्रेक फेल झाल्याने ही बस उलटली असून, जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोरीवलीपासून करमाळाला जाणाऱ्या एसटीचा मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल जवळ अपघात झाला आहे.

रायगड - बोरीवलीपासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याला जाणाऱ्या एसटीचा मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल जवळ अपघात झाला. भोकरपाडा येथील वळणावर ब्रेक फेल झाल्याने ही बस उलटली असून, जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित दुर्घटनेत नितीन लोटके(नगर), सचिन चांदणे (दौंड), पापु रोकडे (लोणावळा), पुष्पा तानाजी कांबळे (पुणे) व रंजना पोहोकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details