महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2020, 9:24 PM IST

ETV Bharat / state

पनवेल महापालिका क्षेत्रात 51 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, 32 जणांना डिस्चार्ज

पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी ५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३२ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय कळंबोलीतील २ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या २९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

new corona patients in panvel Municipal area
पनवेल महापालिका क्षेत्रात 51 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी ५१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३२ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय कळंबोलीतील २ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आजपर्यंत एकूण ११२९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

आज आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये खारघरमधील १८, कामोठ्यातील १४, कळंबोलीतील ७, नवीन पनवेलमधील ५, पनवेलमधील ४, तळोजा येथील २ तर खांदा कॉलनीतील एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ११२९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७८० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या २९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महापालिका क्षेत्रातील ३२ जणांना डिस्चार्ज -

आज महापालिका क्षेत्रातील ३२ जण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पनवेलमधील ११, खारघरमधील १०, कामोठ्यातील ६, नवीन पनवेलमधील ३ तसेच कळंबोलीमधील २ रूग्णांचा समावेश आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details